शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सदोष कोरोना कीट्सचे प्रकरण : जालन्यात रात्र जागून कोविड लॅब उभाणाऱ्या तज्ज्ञांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 18:56 IST

coronavirus दोन्ही तज्ज्ञांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देडॉ. हयातनगरकरांकडून सदोष कीट्सचा मुद्दा उपस्थित

जालना : कोरोना काळात चाचण्यांना मोठे महत्व आहे. पूर्वी जालना जिल्ह्यातील संशयितांचे स्वॅबचे सँपल हे औरंगाबाद येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. त्यामुळे तब्बल २४ ते ३६ तास लागत होते. त्यामुळे जालन्यात कोविड टेस्टींगची लॅब व्हावी यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढाकार घेऊन एक कोटी १० लाख रूपये खर्च करून ही टेस्टींग लॅब जालन्यात उभारली. ही लॅब उभारणीसाठी डॉ. शेजूळ आणि अन्य एका खाजगी पॅथोलॉजिस्ट डॉ. सूर्यकांत हयातनगरकर यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन विक्रमी वेळेत ही लॅब उभारली होती. परंतु आता या दोन्ही तज्ज्ञांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. 

जालन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण हा एप्रिलमध्ये सापडला होता. त्या नंतर रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे जास्तीत जास्तीस्त गतीने कोरोना संशियितांच्या स्वॅबची तपासणी होणे गरजेचे होते. त्यामुळे जालन्यात कोरोना टेस्टींग लॅब व्हावी म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी देखील तातडीने यासाठी मुख्यमंत्री निधीतून एक कोटी रूपये दिले. आणि जूनमध्ये ही लॅब जिल्हा सरकारी रूग्णालयात उभारणीसाठी मंजूरी मिळाली. त्या नंतर आरोग्य मंत्री टोपे यांनी येथील ज्येष्ठ पॅथोलॉजिस्ट डॉ. सूर्यकांत हयातनगरकर यांची यासाठी तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. 

त्यांनी तसेच शासकीय प्रयोगशाळेतील प्रमुख डॉ. शेजूळ या दोघांनी मिळून कोविड लॅबच्या फरशी बसविण्यापासून ते लॅबच्या उद्घाटन आणि नंतर सँपलचे रिपोर्ट येथेच मिळेपर्यंत सर्व ते केले.  हे सर्व करताना या दोघांनी मोठे परिश्रम घेतले. ज्यावेळी ही लॅब येथे उभारण्याचा निर्णय झाला होता, त्यावेळी जागा निवडण्यासह अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करतांना ती कुठे करावी आदी लहानातील लहान बाब देखील या व्दयींनी तंतोतंत पाहिल्यानेच जालन्याची लॅब संपूर्ण राज्यात  अत्याधुनिक झाली आहे. या लॅबच्या धर्तीवर नंतर अन्य जिल्ह्यातही लॅबची उभारणी करण्यात आली. एवढे सर्व करतांना काही किरकोळ कारणांवरून दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. 

डॉ. हयातनगरकरांकडून सदोष कीट्सचा मुद्दा उपस्थितजालन्यात मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने घटल्याचे दिसून येत होते. परंतु कीट्समध्ये तांत्रिक दोष असल्याची बाब डॉ. हयातनगरकर आणि डॉ. शेजूळ यांच्या लक्षात आली. त्यांनी राज्याचे आरोग्य विभागाचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या समवेत झालेल्या आॅनलाईन बैठकीत हा मुद्दा मांडून त्यांचे लक्ष वधेले होते. त्या नंतर सर्व यंत्रणा खडबडून जागे झाली. आणि हा मुद्दा आरोग्य मंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्या पर्यंत पोहचला. या कीट्सचा पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीच्या कीट्स  सँपलच्या तपासणीसाठी नाकारण्यात आल्या असून, काळ्या यादीत असलेल्या कंपनीकडून या कीट्सची खरेदी करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. आता यात चौकशी समिती नेमून या सर्व प्रकरणाची पोलखोल होणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना