शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी हातगाडीवर विकले फुटाणे; आई शिक्षिका अन् मुलगा झाला सॉफ्टवेअर इंजिनिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:32 IST

हातगाडीवर कुल्फी, चने-फुटाणे, जांभूळ विक्री करणारे सुनील वखारे आणि शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या अरूरुणा वखारे यांचा मुलगा ओंकार वखारे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हातगाडीवर कुल्फी, चने-फुटाणे, जांभूळ विक्री करणारे सुनील वखारे आणि शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या अरूरुणा वखारे यांचा मुलगा ओंकार वखारे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. नुकताच त्याने मूळ अमेरिकेची असलेल्या आणि बेंगलोर येथे सुरू असलेल्या कंपनीत नोकरी मिळविली असून, त्याला वार्षिक १६ लाख रूरुपयांचे पॅकेज मिळाले आहे.जुना जालना भागातील गवळी मोहल्ला भागात राहणारे आणि सहावीपर्यंत शिक्षण घेतलेले सुनील वखारे हे कुल्फी, चने-फुटाणे, चांभूळ विक्रीचा व्यवसाय करीत होते. तर त्यांच्या पत्नी अरूणा वखारे यांनी लग्नानंतर बी.ए. डी.एड्. शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. मात्र, त्या काळी पगारही कमी होता. सुनील वखारे यांच्या उत्पन्नातून घर चालत नव्हते. अरूणा वखारे यांची पगार कमी होती. तरीही मोठ्या काटकसरीने संसाराचा गाडा चालविला. मुलगा ओंकार याला नगर परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण दिले. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण सरस्वती भुवन शाळेत घेतले. शिक्षण घेताना घरातील समस्या त्याने जाणल्या होत्या. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्याने ओळखले होते.अकरावी आणि बारावीचे शिक्षण औरंगाबादेतील वसंतराव नाईक महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर ओंकारने जे.ई.चा अभ्यास पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद येथीलच खासगी कोचींग क्लासेसला प्रवेश मिळवला. जेईमध्ये तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांमधून ओंकार वखारे याला भारतातून २३१९ वी रँक (नंबर) मिळाली. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास बळावला आणि अभ्यास सुरूच ठेवला. त्यानंतर ओंकारला आयआयटीसाठी प्रवेश मिळाला. या परीक्षेतही त्याने गरुडझेप घेत भारतातून ७२०६ ची रँक प्राप्त केली. आयआयटी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर ओंकार वखारे याचा (भारतीय प्रयोद्योगिकी संस्था) खडकपूर या संस्थेत एरोसपेस इंनिनियरिंगच्या बी. टेक प्लस एम. टेक या पाच वर्षाचा अभ्यासक्रम त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला. हा कोर्स सुरु असताना अमेरिकास्थित बेंगलोरमध्ये असलेल्या हनीवेल या नामांकित कंपनीत त्याची सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. जॉयनिंग बोनस म्हणून कंपनीने ओंकार वखारे यास दोन लाखाचा बोनस दिला असून, सोळा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देखील मिळाले आहे. हनीवेल ही अमेरिकेची नामांकित कंपनी असून बेंगलोरमध्ये असलेल्या या कंपनीत विमानाचे पार्ट, इंजिन व इतर साहित्याची डिझायनिंग तयार करण्यात येते. दरम्यान, ओंकार वखारे याने कुटुंबातील समस्या, अडचणींवर मात करून मोठ्या जिद्दीने केलेला अभ्यास आणि मिळविलेली नोकरी इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे.आई-वडिलांचे कष्ट, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने मला यश मिळाले आहे. यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश मिळते असे ओंकार वखारे यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूरFamilyपरिवार