शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बुडणाऱ्या मुलाने बचावासाठी आलेल्या बापाला मिठी मारली; दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:01 IST

तब्बल एक तासानंतर दोन्ही मृतेदह बाहेर काढण्यास यश आले

जालना : पोहण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील मोतीतलावात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. माणिक बापूराव निर्वळ (३८), आकाश माणिक निर्वळ (१४) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माणिक निर्वळ हे पत्नी व तीन मुलांसह शहरातील एमआयडीसी परिसरात राहतात. एका कंपनीत काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास ते मुलगा आकाश, रोहित, विकी यांच्यासोबत शहराजवळील मोतीतलावात पोहण्यासाठी गेले होते. आकाश हा पोहण्यासाठी तलावात गेला. माणिक निर्वळ व अन्य दोन मुले हे तलावाच्या काठाला पोहत होते. तेवढ्यात आकाश पाण्यात बुडाला. हे पाहताच माणिक निर्वळ त्याला वाचविण्यासाठी गेले. आकाशने त्यांना मिठी मारली. यात दोघेही बुडले. त्याचवेळी रोहित व विकी यांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी याची माहिती नातेवाइकांना दिली.

नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळविले. माहिती मिळताच, चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमक दलाच्या जवानांना बोलावून शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल एक तासानंतर दोन्ही मृतेदह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालना