लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : सिंचन विहिरींच्या अनुदानासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी मागील पाच दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. जो पर्यंत जि.पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या उपोषणाला भेट देणार नाही, तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा या उपोषण कर्त्यांनी घेतला आहे.परतूर तालुक्यातील सिंचन विहिंरीचे रखडलेले अनुदान देण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी १ जानेवारीपासून उपोषण आरंभिले आहे.शुक्रवारी जि. प. चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे व गटविकास अधिकारी गंगावणे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेवून लेखी आश्वासन देवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी भेट देवून आमचे थकित अनुदान अदा करावे, त्यानंतरच उपोषण सोडण्यात येईल, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.
पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:35 IST