शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:59 IST

कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकट्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चित्र गंभीर स्वरूपाचे असून, या बँकेच्या ठेवी तीन महिन्यात ३७५ कोटी रूपयांवरून थेट २७४ कोटींवर येऊन ठेपल्या आहेत.गेल्या चार वर्षापासून जालना जिल्हा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे, याचा परिणाम एकूणच जिल्ह्यातील शेतीचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. उत्पादन घटल्याने शेतक-यांच्या हातात खेळणारा पैसा झपाट्याने कमी झाला आहे. या ठेवी मोडण्याची वेळ शेतकºयांवर का आली, याची विचारणा बँकेत केली असता, अनेकांनी आपल्या मुलींचा विवाह तसेच शेतीच्या कामासाठी ठेवी मोडल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा बँकेतून शंभर कोटीच्या ठेवी मोडल्याचे समोर आले असले तरी, जिल्ह्यातील अन्य सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकेतूनही अनेक शेतक-यांनी त्यांच्या संचित निधीला धक्का लावल्याचे सांगण्यात आले.एकूण जालना जिल्ह्यातून जवळपास ५०० कोटी पेक्षा अधिक ठेवी विविध बँकांतून शेतकºयांनी काढल्या असाव्यात असा अंदाज बँक अधिका-यांनी वर्तविला आहे.ठेवी ठेवतांनाच शेतक-यांना पैशांची जमवाजमव करावी लागते. त्यातच त्या ठेवी या दूरवरचा विचार करून ठेवल्या जातात. एकीकडे ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असतानाच पीककर्ज मिळत नसल्याने देखील ठेवी मोडल्याचे शेतक-यांनी नमूद केले. एकूणच अनेक शेतक-यांनी आपल्या ठेवी कायम ठेवत खाजगी सावकारांच्या दारात जाऊन पेरणीसह अन्य कामांसाठी कर्ज काढल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ही ११० एवढी असल्याचे सांगण्यात आले.आम्ही आशावादी आहोतआज जरी शेतक-याने त्यांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर मोडल्या आहेत, हे वास्तव आहे. परंतु शेतक-यांला चांगले उत्पादन झाल्यास तो थोडी-थोडी बचत करून पुन्हा ठेवी जमा करेल असा आमचा अनुभव आणि विश्वास आहे. परंतु यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठेवी मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असा आपला अंदाज आहे. - आशुतोष देशमुख,व्यवस्थापकीय संचालक, मध्यवती बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीInvestmentगुंतवणूकdroughtदुष्काळ