शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लाल मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:46 IST

आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे.

रवींद्र लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपारध : काही तरी वेगळे करुन दाखविण्याच्या तुमच्यात धमक असेल, आणि त्याला कष्टाची जोड दिल्यास तुम्हाला कोणत्याची क्षेत्रात यश नक्की मिळते. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे. भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील संदीप काटोले या तरुण शेतक-याने ही किमया करुन दाखविल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.मिरचीचे आगार म्हणून पारध परिसराची ओळख आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. तर काही शेतक-यांनी उपलब्ध पाण्यावर मिरची पीक जगविण्याची धडपड केली. मात्र अनेकांच्या हाती निराशा आली. मात्र याला अपवाद ठरले युवा शेतकरी संदीप काटोले. आपल्या शेतात पाणी नसल्याने काटोले यांनी इतर शेतक-यांची बारा एकर जमीन बटाईने केली. त्या शेतीत मिरची लागवड करुन आतापर्यंत त्या मिरचीतून ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे या शेतक-याने इतर शेतक-यांसमोर एक वेगळा आदर्श उभा केला असल्याने परिसरातील शेतकरी काटोले यांचे कौतुक करु लागले आहेत. काटोले यांच्याकडे पंधरा एकर शेती आहे. त्यांनी तीन एकरात आपल्या भावाच्या मदतीने टरबूज तर तीन एकरांत वांग्याची लागवड केली आहे. पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत कमी खर्चात जास्त उत्पादन निघावे म्हणून काटोले यांनी निंबोळा येथील शेतकरी अनिल देशपांडे यांची बारा एकर शेत जमीन बटाईने केली. या शेतीत जून महिन्यातच बारा एकरात सव्वा लाख मिरचीच्या रोपाची ठिंबकद्वारे लागवड केली. लागवडीपासून ते आतापर्यंत साडे नऊ लाख रुपये खर्च झाला असल्याचे या शेतक-याने सांगितले आहे. दरम्यान, लाल मिरचीतून काही तरी हाती पडेल यासाठी त्यांनी दीड महिन्यापासून मिरची न तोडता ती झाडावरच लाल होऊ दिली. गेल्या तीन दिवसांपूर्वी ती तोडली असता तब्बल सहाशे क्विंटल मिरची निघाली. सध्या लाल मिरचीला नागपूर, मध्य प्रदेश, पुणे, नगर, नंदुरबार इ. बाजारपेठेत दहा ते बारा हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी