शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:06 IST

बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आहे.आतापर्यंत केवळ तीन टक्के पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील शेतक-यांना येत्या खरीप आणि रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपये ...

बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आहे.आतापर्यंत केवळ तीन टक्के पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील शेतक-यांना येत्या खरीप आणि रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपये कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या असून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार आहे. या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे ते नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत कृषी पतपुरवठ्याच्या रकमेमध्ये तब्बल ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६२ शाखांसह राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकामधून प्रत्यक्ष कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. खरीप हंगात तोंडावर आल्यामुळे बी-बियाणे, खते व अन्य साहित्य खरेदीसाठी पैशाची गरज असल्यामुळे शेतकरी बँकेत गर्दी करत आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, बँकेच्या आॅनलाइन कामकाज प्रणालीमध्ये येणारा व्यत्यय यामुळे पीककर्ज वाटप संथ गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर पीककर्जासाठी आवश्यक सातबारा, एकूण जमिनीचा दाखला, फेरफार नक्कल, जमिनीच्या चतु:सीमा, मूल्यांकन इ. कागदपत्रे गोळा करताना शेतक-यांची दमछाक होत आहे. अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक येत नसल्याने शेतक-यांना कागदपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. ग्रामीण भागात आपले सरकार पोर्टलवरील सातबारा मिळविताना अडचणी येत आहेत. राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँक मिळून १७ मे पर्यंत ४५ कोटींच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, बँकेने ११ हजार शेतकºयांना २३ कोटी ९२ लाखांच्या पीकर्जाचे वाटप केले आहे. शेतक-यांची अडचण लक्षात घेता पीककर्ज वाटपाचे काम बँकांनी प्राधान्याने करण्याची गरज आहे.बँकांना सूचना : यंदा पात्र शेतकरी वाढलेकर्जमाफी मिळाल्यामुळे यंदा सुमारे ९५ हजार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. सर्व बँकांना कृषी कर्जाचे प्राधान्याने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ४५ कोटींचे पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना