शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विष घेऊनही शेतकऱ्याचा प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:24 IST

पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी जी म्हण मराठीत रूढ झाली आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आला आहे. पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत. कळकुंबे हे बुधवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात याचा पाठपुरावा करण्यासाठी आल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांची बाजू ऐकून घेत पुन्हा एका सर्व यंत्रणांना सतर्क करून पुढील आठवड्यात यावर विशेष बैठक बोलावली आहे.कळकुंबे यांची अंतरवाला-सिंदखेड येथे शेतजमीन होती. गटबांधणी करताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा साधारपणे १९७० मध्ये झाला होता.त्यावेळी ते लहान होते. त्यामुळे त्यांचे नाव सातबारावर अल्पज्ञानी म्हणून आले होते. त्यावेळी शासनाने गटबांधणी दरम्यान ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करणे शिल्लक आहेत, अशांना ४० दिवसात अपील दाखल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कळकुंबे यांच्याकडून कुठलाच आक्षेप आला नाही. त्यामुळे त्यावेळी हे प्रकरण थंड बस्त्यात पडले. सज्ञान झाल्यावर संबंधित दत्तू कळकुंबे यांनी साधारपणे १९८५ पासून आपले नाव वडिलो पार्जित शेत जमिनीच्या सातबाराच्या उताºयावर यावे म्हणून महसूल तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.नंतर अनेकवेळा शासन दरबारी वेगवेगळ्या कार्यालयात या संदर्भात दाद मागितली. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला होता. तेथेही निकाल हा कळकुंबे यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे कळकुंबे यांनी आता या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे अशी विनंती बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळकुंबे यांना केली. तसेच वेगवेगळ्या यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचा-यांना बोलावून त्यांना यात काही करता येते काय, या बाबतही चर्चा केली. दरम्यान जलप्रकल्प उभारणीसाठी त्यांच्या गावातील अनेकांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. मुलाला धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून तरी मला आता मदत हवी अशी आर्त विनंती कळकुंबे यांनी वायाळ यांच्याकडे केली. मात्र, त्यासाठी आवश्यक ती सर्व कागपत्र शोधून त्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाशी संदर्भातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बैठकीस बोलावून त्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कळकुंबे यांना वायाळ यांनी दिले.शेतकरी खिन्न : जावे तरी कुठे ?आजही कळकुंबे हे त्यांच्याकडे असलेले सर्व कागदपत्र वायाळ यांना दाखवून काहीही करा, पण मला मदत करा अशी विनंती करताना दिसून आले. एकूणच हा कळकुंबे यांचा गंभीर प्रश्न असतांना आणि संबंधित शेतक-याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विषारी द्रव घेतल्या नंतर आता याला पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही न्याय मिळत नसल्याने आपण खिन्न झालो असल्याचे त्यांनी कळकुंबे यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना