शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:51 IST

अपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात.

ठळक मुद्देविविध कारणांमुळे ३९ प्रस्ताव बाद 

जालना : शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आहेत; परंतु अनेक योजना जिल्हा व तालुका पातळीवरील उदासीन प्रशासकीय यंत्रणेमुळे खितपत पडलेल्या आहेत. याचाच प्रत्यय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत आला आहे. या योजनेविषयी ग्रामीण भागात फारशी जनजागृती नसल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात केवळ १४१ जणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर कागदपत्रांअभावी ३९ प्रस्ताव बाद करण्यात आले आहेत. 

शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा अपघाती घटनांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक मदत केली जात आहे. यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेविषयी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये फारशी माहिती नाही. तसेच योजनेसाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यात मोठा कालावधी लागतो. त्यामुळे सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी प्रस्ताव पाठवीत नाहीत. 

१ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान ७५ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. यात ५१ जणांना लाभ मिळाला असून, २३ जणांच्या प्रस्तावात कागदपत्रांच्या त्रुटी सांगून नाकारण्यात आले आहे. ८ डिसेंबर २०१७ ते ७ डिसेंबर २०१८ या वर्षभरात १०५ जणांपैकी ६४ जणांना लाभ तर १५ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तर ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. ८ डिसेंबर २०१८ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ११८ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. पैकी २६ जणांना लाभ, तर ५२ प्रस्ताव प्रलंबित तर ३९ प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. चालू वर्षात आलेले ५० प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जनजागृतीबाबत कृषी विभागाचे दुर्लक्षअपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. तर अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये मिळतात. मागील दीड वर्षापूर्वी घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी कुटुंबातील कृष्णा दत्ता बिडवे (२०) याचा काळेगाव येथे अपघात झाला होता. यात कृष्णाचा मृत्यू झाला; परंतु आम्हाला  गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला सदरील योजनेसाठी प्रस्ताव पाठविता आला नसल्याची माहिती मयत कृष्णाचा लहान भाऊ प्रशांत बिडवे याने दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूJalanaजालना