शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:29 IST

तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीची कामे करताना दिसत असून, कृषी विभागाने यावर्षी साडेपाच लाख हेक्टरवर खरीप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.जिल्ह्यात सतत चार वर्षापासून कमी पर्जन्यमान, दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे यातून होरपळलेला शेतकरी कंबर कसून खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, ठिबक संच खरेदीसाठी लगबग चालू आहे.यावर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाचे बियाणे खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे बँकाही पीककर्ज देत नसल्याने शेतकरी हैराण झाला असून, उसनवारी करुन शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेती मशागतीला लागला आहे.पारा : तीव्र उन्हाचा कामांना फटका१ मेपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४१ ते ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला आहे. पारा ४१ ते ४३ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे.साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापूर्वीपासून बळीराजा खरिपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदी कामे तो करीत असतो. परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMonsoon Specialमानसून स्पेशल