शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचे उद्दिष्ट ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:52 IST

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. यामुळे सिंचन क्षमतावाढीसह शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. असे असले तरी यंदा कमी पाऊस पडल्याने या शेततळ्यात जेमतेम पाणीसाठा आहे.मागेल त्याला शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात यंदा सहा हजार शेततळी व्हावित असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु अर्जांची संख्या जास्त आल्याने त्यांना ही कामे करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील शेततळ्यांचे जवळपास एक हजार शेततळ्याचे अनुदान लेखा परीक्षकांच्या आक्षेपामुळे थकले आहे. हे अनुदानही लवकरच वितरित करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्हा सिंचनाच्या अनुशेषाबाबत अद्यापही कोसो दूर आहेत, त्यामुळे शेततळे, आहे ते पाणी ठिबक सिंचनाव्दारे देणे इ. कामांना प्राधान्य दिले जात आहे.केंद्र आणि राज्य सरकारकडून सूक्ष्मसिंचन अर्थात ठिबक सिंचनासाठी देखील भरीव अनुदान दिले जात असल्याने ठिबक संच बसविण्यावर शेतक-यांचा भर आहे. यामुळे अधिकाधिक शेती सिंचनाखाली येणार आहे.दहा कोटी अनुदान प्राप्तठिबक सिंचनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यात केंद्र सरकारचे सहा कोटी रूपये मिळाले होते, पैकी चार कोटी रूपयांचे अनुदान संबंधित पात्र शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. तर राज्य सरकारचे चार कोटी रूपयांचे अनुदान दिवाळीनंतर मिळाले होते. त्यापैकी जवळपास अडीच कोटी रूपये शेतक-यां देण्यात आले आहेत.- विजय माईनकर,कृषी अधीक्षक जालना

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी