शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेतले, इलेक्ट्रिक स्कुटी पाठवली नाही; बनावट वेबसाईट चालवणारा भामटा बिहारमधून ताब्यात

By दिपक ढोले  | Updated: March 28, 2023 15:05 IST

'ओला इलेक्ट्रिक स्कुटी' च्या नावे बनावट वेबसाईट; फसवणूक करणारा भामटा बिहारमधून ताब्यात

जालना : ओला इलेक्ट्रिक स्कुटी  या नावाने बनावट वेबसाईट तयार करून परतूर येथील एका जणाची एक लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयितास सायबर  पोलिसांनी बिहार राज्यातील  नालंदा येथून ताब्यात घेतले. संशयिताकडून सात मोबाईल व रोख रक्कम असा एकण एक लाख 5८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रिंकेशकुमार दिनेश प्रसाद (२५, रा.धरहरा, जि.नालंदा,बिहार) असे ताब्यात घेतलेल्या संशयिातचे नाव आहे.

परतूर येथील संजय शर्मा यांनी ओला इलेक्ट्रिक स्कुटी या वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर फोन करून इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करण्यासंदर्भात संशयित रिंकेशकुमार याच्याशी संपर्क केला होता. संशयिताने फिर्यादीस टप्प्याटप्प्याने एक लाख ४८ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, ठरलेल्या वेळेत स्कुटी पाठवली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. 

या प्रकरणी सुरुवातीला परतूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, रिंकेशकुमार याचा मोबाईल सुरू असल्याने सायबर  पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळविले. जालना सायबर ठाण्याचे एक पथक दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासात नालंदा भागात असल्याने या पथकाने संशयित रिंकेशकुमार यास नालंदा येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, सहायक निरीक्षक एस.बी. कासुळे, कर्मचारी संदीप मांटे, गोरख भवर, इरफान शेख, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना