शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जालना जिल्हा परिषदेत एक कोटींच्या कामांना बनावट प्रशासकीय मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:20 IST

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाशी संबंधित खळबळजनक प्रकार

जालना : एकीकडे शासकीय अनुदान वाटपातील घोटाळ्याने जालना जिल्हा चर्चेत असताना आता जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत तब्बल एक कोटी रुपयांच्या कामाच्या बनावट प्रशासकीय मान्यता घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली असून, गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. हा प्रकार कोणी केला याचा तपास सुरू असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार चौकशी समिती गठीत केली जाणार असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

चार दिवसांपूर्वी काही नागरिक जिल्हा परिषद समाजकल्याण अंतर्गत देण्यात आलेल्या प्रमा (प्रशासकीय मान्यता) घेऊन कार्यालयात आले होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेच्या सन २०२४-२५ वर्षाच्या बनावट प्रशासकीय मान्यता असल्याचे दिसून आले. त्या प्रमा या डिसेंबर २०२४ मध्ये दिल्याचे दिसून येत आहे. समाजकल्याण अंतर्गत कामांच्या मंजुरी या ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या आहेत. त्याशिवाय ज्या एक कोटी रुपये कामांच्या प्रमा समोर आलेल्या आहेत, त्याचा जावक क्रमांकही जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील नोंदीशी जुळत नाही. बनावट जावक क्रमांक टाकून कामे करत शासकीय रकमेचा अपहार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर समाजकल्याण अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय पंचायत समितीस्तरावर चौकशी केली असता, त्या प्रमानुसार कामे झालेली नसल्याचे समोर आले आहे.

कोणत्या गावातील कामांचा समावेशबनावट तयार करण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेत प्रत्येकी दहा लाख रुपयांची कामे आहेत. त्यात रामनगर, खरपुडी, खानेपुरी, साळेगाव खारे, रोहनवाडी, सोमनाथ जळगाव या गावांतील कामांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची समितीबनावट प्रमा (प्रशासकीय मान्यता) तयार करून शासकीय निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. कागदपत्रांच्या पडताळणीत प्रमावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट सही केली असून, अक्षरांमध्येही तफावत आहे. त्यामुळे या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, यासाठी आपण अहवाल देणार असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषदfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी