स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
जालना : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आलेल्या जिजाऊ लेख स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विमल आगलावे, संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष विभावरी ताकट, मनीषा पाटील, वर्षा देशमुख, डॉ. मंगल मुळे, सुवर्णा राऊत, सविता मोरे, निशा गुंड, योगीता टकले, सुचिता शिनगारे, नागे, काळे आदींची उपस्थिती होती.
नाभिक सेवा संघाकडून गिराम यांचा सत्कार
जालना : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून भरतनाट्यममध्ये बीए पदवी संपादन केल्याबद्दल नाभिक सेवा संघाच्या वतीने मनीषा गिराम हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा अध्यक्ष सेनाजी काळे, ज्ञानेश्वर गिराम, कृष्णा पंडित, दत्ता वरपे, पूजा वाघमारे, गणेश वाघमारे, शांताराम गिराम, दत्ता गिराम, राधाकिसन मुंजळ, रेखा गिराम, उषा वखरे, प्रतिभा काळे आदींची उपस्थिती होती.
अंबड शहरात निधी संकलनास प्रारंभ
अंबड : शहरातील मत्स्योदरी देवी संस्थान येथून आयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर बांधकामासाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास तहसीलदार विद्याचरण कडवकर, विश्वस्त बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब कटारे, ॲड. द्वारकादास मंत्री, ॲड. आर. आर. कुलकर्णी, दीपक ठाकूर आदींची उपस्थिती होती. शहरातील विविध घटकांत काम करणाऱ्या नागरिकांकडून या निधीचे संकलन केले जाणार आहे. यावेळी अंबड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.