लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावात झालेल्या घरकुल व शौचालय बांधकामाचा चौकशी अहवाल तयार करून तो तात्कालीन सरपंचाच्या बाजूने सादर करण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या विस्तार अधिका-यासह कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत विभागाने सोमवारी मंठा रोडवरील एका हॉटेलमधून अटक केली. आसाराम चव्हाण (५०, रा. मंठा बायपास, जालना) व स्नेहल विनायक भोसले (३६, ह. मु. व्हीएसएस महाविद्यालयाजवळ) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नावे असून, दोघेही मंठा पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे.या प्रकरणातील तक्रारदार मंठा तालुक्यातील वैद्यवडगावचे तात्कालीन सरपंच आहेत. त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात झालेल्या घरकूल व शौचालय बांधकामाच्या चौकशीत तक्रादार यांच्या विरुध्द खोटा चौकशी अहवाल तयार करून त्यात अडकवितो, असे सांगून विस्तार अधिकारी आत्माराम चव्हाण यांनी कनिष्ठ अभियंता स्नेहल भोसले यांच्या मार्फत तक्रारदाराकडे ४० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
विस्तार अधिकारी लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:00 IST