शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क २० वरून ४०० रुपयांवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:36 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले आहे. शिक्षण विभागाच्या तुघलकी निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांत नाराजीचा सूर आहे.शिक्षणासह विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व्यवसायिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ब्यूटीपार्लर कोर्स, मेकॅनिकल, छोटे व्यवसाय उभारीचा इ. सर्टिफिकेट कोर्स विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. यात ४०० रुपयांची कौशल्य चाचणी संस्थेस २०० रूपये, कच्च्या मालासाठी परीक्षा केंद्रास १०० रूपये व एमएससीव्हीटी खर्च १०० रूपये अशी विभागणी केली आहे. याची कुठलीच गरज नसल्याची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने या शुल्क वाढीला डोळेबंद करुन मान्यता दिली आहे. या संदर्भात जाणकार व्यक्तीने सांगितले की, चाचणी संस्थाही शासकीय असल्याने त्यांना २०० रुपये देण्याची गरज नाही. यात मंडळाचा प्रशासकीय खर्च १०० रूपये आकारण्यात आल्याने त्यांनी सांगितले.एकीकडे तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची मनमानी सुरु असून दुसरीकडे शासकीय तांत्रिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव आहे.परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून तांत्रिक विषयाच्या परीक्षा शुल्कात ३८० रूपयांची वाढ केल्याचा निर्णय शाळांना कळविण्यात आला. हा निर्णय विद्यार्थी, आणि पालकांना माहीत नसल्याने उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांची तारेवरची कसरत करावी लागत आहे.चूक झाल्यास दंडविद्यार्थ्यांना परीक्षा आवेदनपत्र आॅनलाईन भरावे लागते. शिक्षण मंडळाच्या वेबसाईट व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेत वारंवार वाढ करण्यात आली. या अर्जामध्ये अनवधानाने चुका राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी शाळा अथवा मुख्याध्यापकावर प्रति दुरुस्ती ५० रूपये दंड आकारण्यात आल्याने शिक्षकांत नाराजी आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रtechnologyतंत्रज्ञानStudentविद्यार्थी