शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तहसीलचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:41 IST

भोकरदन तहसील कार्यालयाकडे वीजवितरण कंपनीचे ७ लाख ६६ हजार रुपयाचे विजबिल थकल्याने मंगळवारी वीजवितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तहसील कार्यालयाकडे वीजवितरण कंपनीचे ७ लाख ६६ हजार रुपयाचे विजबिल थकल्याने मंगळवारी वीजवितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे तहसील कार्यालयाचे दिवसभर कामकाज ठप्प होते. तर तहसील कार्यालयाने सुध्दा वीजवितरण कंपनीकडे ३ लाख रूपयांची अकृषक कर थकबाकी असल्यामुळे वसुलीसाठी कर्मचारी पाठविले होते.भोकरदन येथील विजवितरण कंपनीचे तहसील कार्यालयाकडे ७ लाख ६६ हजार रूपये वीजबिल थकले होते. संबंधित वीजबिल भरण्यासाठी वीजवितरण कपंनीने तहसील कार्यालयाला वेळोवेळी नोटीसा दिल्या होत्या. मात्र, तहसील कार्यालयाने वीजबिल भरले नाही. त्यामुळे कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दीपक तुरे यांनी कर्मचाऱ्यांना पाठवून तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे दिवसभर कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. त्यानंतर तहसीलदार संतोष गोरड यांनी दोन दिवसात वीजबिल भरण्याचे आश्वासन अधिकाºयांना दिले. परंतु, त्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी वीजवितरणकडे अकृषक कराचे थकलेले पैसे तात्काळ भरण्याचे सांगून कंपनीला कुलूप लावण्यासाठी कर्मचा-यांना पाठवले.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागmahavitaranमहावितरणelectricityवीज