शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी स्रेहमिलनातून निवडणुकांची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:30 IST

दिवाळी निमित्त विविध राजकीय पक्षांनी स्रेहमिलन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या माघ्यमातून आगामी लोकसभा तसेच विधानसभेची आरासच जणूकाही रंगवली गेल्याचे चित्र दिसून आले.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवाळी निमित्त विविध राजकीय पक्षांनी स्रेहमिलन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या माघ्यमातून आगामी लोकसभा तसेच विधानसभेची आरासच जणूकाही रंगवली गेल्याचे चित्र दिसून आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात हे कार्यक्रम घेतले तर आ. राजेश टोपे यांनी वडिलांची परंपरा चालवत पाथरावाला येथे थांबून कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या.या कार्यक्रमांतून प्रत्येकाने आपआपली राजकीय महत्वकांक्षा साधल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी स्रेहमिलनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची प्रतीक्षा करावली लागली. लोणीकर आल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, जि.प.चे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, बाजार समितीचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष सिध्दिविनायक मुळे, प्रसिध्द गायक राजेश सरकटे आदींची यावेळी उपस्थिती होती.यावेळी पाथरवाला येथे आ. राजेश टोपे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा स्विकारल्यानंतर त्यांनी रात्री बबनराव लोणीकर यांच्या स्रेहमिलन कार्यक्रमास उपस्थित राहून आपले मनोगत करून शुभेच्छा दिल्या. दुष्काळ निवारणार्थ सर्वांनी पक्षभेद विसरून काम करण्याचे ते म्हणाले.मीच खासदार : रावसाहेब दानवेया कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले की, पुढील खासदारही मीच राहणार असून, पुढील वर्षीच्या दिवाळीचेही आताच स्रेहमिलनाचे निमंत्रण देत असल्याचे सांगून आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला. सायंकाळी नगरसेवक अशोक पांगारकर यांच्या कार्यक्रमात आता निवडणुक आचारसहिंता लागण्यास दोन महिन्याचा कालावधी असल्याने शक्य तेवढा जास्तीत जास्त निधी खेचून आणू असे सांगितले. एकूणच रात्री पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित केलेल्या स्रेहमिलन कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप तौर यांचे खा. दानवे यांनी लवून दर्शन घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी लोणीकरांनी देखील पुढील दिवाळी स्रेहमिलनाचे निमंत्रण बिनधास्तपणे द्यावे असे सांगितले.शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य : अर्जुन खोतकरराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पाडव्याच्या दिवशी त्यांच्या संपर्क कार्यालयात दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांना शुभेच्छा देण्यायसाठी मतदार संघासह अन्य प्रतिष्ठीतांनी गर्दी केली होेती. यावेळी भाऊंच्या मार्गदशनाकडे सर्वााचे लक्ष लागले होते. ते काही तरी नवीन घोषणा करतील अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती. मात्र अर्जुन खोतकरांनी यावेळी केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दुष्काळाचा सामना करण्याची ताकद ईश्वर चरणी मागितली. यावेळी शिवसेना प्रमुख भास्कर अंबेकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून शुभेच्छा स्विकारल्या. एकप्रकारे दिवाळीनिमित्त अभिमन्यू खोतकर यांनाही राजकारणाचे बाळकडू देण्यात आले. संजय खोतकर, वल्लभ खोतकर, माजी आ. संतोष सांबरे यांचीही उपस्थिती होती.वेळप्रसंगी टीकाही करणार : कैलास गोरंट्यालभाजपचे नगरसेवक अशोक पांगारकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची स्तुती केली. ते म्हणाले की, आयसीटी, ड्रायपोर्टसह जालन्यातील विकास कामांसाठी दानवेंनी निधी आणला. परंतु लाल दिवा असणाºया म्हणजेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव घेता त्यांनी मदत केली नसल्याचे सांगितले. शहर विकाासासाठी हवी ती मदत करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे सांगून, औरंगाबादेत येऊ घातलेले क्रीडा विद्यापीठ जालन्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी आपण रावसाहेब दानवेंवर टीका करू हे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DiwaliदिवाळीPoliticsराजकारण