शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसामुळे जालना जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:54 IST

जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे. तर भोकरदन व जाफराबाद तालुक्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.जून च्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे काही शेतक-यांनी कपाशीची लागवड व पेरणी केली होती. परंतु, त्या गेल्या पावसाने १५ ते २० दिवस उघडीप दिली. परिणामी शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून गेली. तसेच तीव्र पाणीटंचाईचे सावटही उभे राहिले होते. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, मंठा, बदनापूर, घनसावंगी या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत पडल्याने बळीराजा सुखावला असून, राहिलेल्या शेतक-यांनी पेरणी व कपाशीची लागवड सुरु केली आहे. काही भागामध्ये सध्या पेरणीत आणि कपाशी लागवड करण्यात मग्न असल्याचे दिसून आले.पावसाची प्रतीक्षाजिल्ह्यातील इतर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु असून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरण्या व लागवडीत गुंतला आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद हे तालुके चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी