शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"ड्रोन टप्प्यात आले की एका गोट्यातच खाली पाडतो"; टेहळणीच्या प्रकारावर मनोज जरांगे संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:42 IST

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची सहकाऱ्यांची मागणी

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ड्रोन टप्प्यात येत आले की एका गोट्यात खाली पाडतो आम्ही, असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील घराची टेहळणी प्रकार समोर आल्यानंतर दिला. तसेच तुम्ही कितीही बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मी मागे हटणार नाही, तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही, मला मॅनेज करू शकत नाही. त्यामुळेच हे असे प्रयोग सुरू असतील अशी शंका देखील जरांगे यांनी व्यक्त केली.

अंतरवाली सराटी गावात आणि मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या परिसरात ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारची तक्रार ग्रामस्थांनी पोलिसांत केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे अनेक दिवसापासून चालू आहे. व्हिडिओ बनवायचे समाजात गैरसमज पसरवायचा. मी काही मॅनेज होत नाही. मराठ्यांसाठी मरण्यास तयार, मात्र मागे हटणार नाही. ओबीसी  व मराठा बांधवात आम्ही वाद विवाद होऊ देणार नाही. कोणीतरी बाहेरचा माणूस जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. येथील कोणीच अशा गोष्टी करू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले. 

गोरगरीब मराठा समाजाचे पोरं मोठे व्हावे यासाठी मी लढतोय. आता ही वेळ आहे, मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. तसेच जर ओबीसी समाज ताकदीने एकत्र येऊ शकतो तर आता मराठ्यांनी या शांतता रॅलीत एकत्र यावे. येवलावाला राजकीय फायद्यासाठी हे करतो आहे. ओबीसींचे नेते येवलावाल्याने एकत्र केले. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावं, हीच वेळ आहे. आपली शांतता रॅली निघणार आहे, त्यासाठी हा विरोध असल्याचेही जरांगे म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या२६ जूनपासून ड्रोनने टेहाळणी सुरू आहे. याबाबत गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना तोंडी तक्रार दिली आहे. यासंदर्भात त्यांनीही पाहणी केली. सोमवारी ही पुन्हा ड्रोनने अंतरवाली गावात व माझ्या मळ्यात टेहाळणी केली. याबाबत गोंदी पोलिसांना कळवले आहे. त्यांची गाडी ही रात्री आली होती. याबाबत गोंदी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार देणार आहे. झालेला प्रकार पाहता मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास यावी, अशी मागणी जरांगे यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी केली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना