शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘डीआरएम’नी केली अधिकाऱ्यांना झापाझापी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:36 IST

रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी येथील रेल्वेस्थानकाची सोमवारी नियोजित दौºयात तब्बल एक तास पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी येथील रेल्वेस्थानकाची सोमवारी नियोजित दौºयात तब्बल एक तास पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता, दुचाकी पार्किंग, फुटलेल्या फरशा यासह अन्य मुद्यावरून अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली.दरम्यान त्यांनी केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक अधिका-यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. डीआरएम यांचा नियोजित दौरा असल्याने येथील प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून रेल्वेस्थानक परिसरातील सर्वच परिसराची रंगरंगोटी केली होती. डीआरएम हे किती वेळ थांबणार याची कसलीही पूर्व सूचना नसल्याने अनेकांनी त्यांच्या दौ-याला विशेष महत्व दिलेले नव्हते.सोमवारी त्यांचे ४ वाजता रेल्वेस्थानकावर आगमन झाले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम रेल्वेपटरीची पाहणी करित तिचा गंज काढून ग्रीसिंग करण्याचे सांगत रेल्वेफाटकावरील स्टिकर नवीन लावण्याचे आदेश दिले. यानंतर जवळच असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकाची पाहणी करून हे कधी बनवले, असा सवाल केला. बनविताना रेल्वे रुळापासून किती अंतर सोडले याचे मोजमाप केले काय, कामाची तपासणी केली का, असे अनेक प्रश्न विचारीत अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले होते.यानंतर त्यांनी आपला मोर्चा स्थानकाबाहेर वळविला असता तेथे त्यांना अनेक दुचाकी उभ्या असल्याचे दिसले, त्यांनी ही पार्किंगची जागा आहे काय, अशी विचारणा केली असता, अधिका-यांनी याचे उत्तर नाही असे दिले. त्यांनी तातडीने येथून सर्व दुचाकी हटविण्याचे आदेश दिले. पार्सल रूमकडे जाऊन त्यांनी तेथील लोंबकळलेल्या केबल पाहूनही तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच तेथील अस्वच्छतेच्या मुद्यावरूनही ते जाम चिडले होते.यावेळी डीआरएम यांनी पुरूष, महिला प्रतीक्षालय, उपाहारगृह, उपअधीक्षक कार्यालयातील घटना नोंद रजिस्टर, ओव्हरब्रिजची पाहणी केली. यासह अन्य प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेJalanaजालना