शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बस थांबविण्यावरून चालक- प्रवासी महिलेमध्ये तासभर शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:42 IST

शहागड येथे बस थांबविण्याच्या कारणावरून प्रवासी व चालकात रविवारी दुपारी शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला होता की चालकाने बस चक्क पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेली

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : शहागड येथे बस थांबविण्याच्या कारणावरून प्रवासी व चालकात रविवारी दुपारी शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला होता की चालकाने बस चक्क पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेली होती. मात्र, नंतर वाद मिटल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली नाही.शहागड बसस्थानकासमोर सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड पासून दहा मीटरवर बसस्थानक आहे. तरीही बसस्थानकात बस घेण्यासाठी चालक- वाहक टाळाटाळ करतात. बस दहा मिटरवर थांबत असल्याने बसस्थानकात बसलेल्या प्रवाशांना पळत येऊन बस गाठावी लागते. असाच प्रकार रविवारी दुपारी घडला. लातूर- जळगाव बस (क्र. एम.एच.२०- बी.एल. ३४२९) बसस्थानकात घेणे- बाहेर थांबण्या वरून चालक व प्रवाशी महिलेमध्ये शाब्दीक चकमक झाली. महिला व चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे प्रकरण वाढले. तद्नंतर चालक व त्या महिलेने बस शहागड पोलीस चौकीतच घेऊन जाण्याचा जोर धरला. तद्नंतर बस पैठण रोड मार्गे शहागड पोलीस चौकीच्या दिशेने गेली. बस चौकीत पोहोचण्याआगोदर नागरिकांनी चौकी परिसरात गर्दी केली. बस चौकीच्या गेट पर्यंत येऊन थांबली. बस मधील लांब पल्ल्यावरील प्रवाशांनी बस चौकीत नेऊन कशाला वाद वाढविता असे सांगत दोघांची समजूत काढली. जवळपास तासभर चाललेला हा वाद पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर मिटला. त्यानंतर बस पुढील मार्गावर मार्गस्थ झाली.

टॅग्स :state transportएसटीBus DriverबसचालकPolice Stationपोलीस ठाणे