शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत असून जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा असे अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत धीर सोडता कामा नये. शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.ते माळी महासंघ चंदनझिरा शाखेच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, रशिद पहेलवान, गणेश राऊत, सतिष जाधव, संतोष मोहिते आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सणवार व अनेक रुढी यांवर अनाठायी होणारा खर्च कमी करुन शिक्षण, आरोग्य अशा आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे. पूर्वीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा देतांना ते म्हणाले की, समाजात व कुटूंबात एकोपा, संस्कार, शिस्त, सामंजस्य हवे तरच कुटूंबाचा व समाजाचा विकास होऊ शकतो. आजही आपण नाहक अनेक कर्मकांडांत गुंतलो असून त्यामुळे पाहिजे त्याप्रमाणात प्रगती होऊ शकलेली नाही, असेही ते म्हणाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, सध्याच्या यांत्रिक युगात माणूस यंत्रासारखा वागत आहे. मनुष्य प्राण्याला भाव भावना असतात. यामध्ये प्रेम, स्नेह भावना जर भावनाच संपल्या तर आपले सर्व सामाजिक स्वास्त्य व समाज रचनाच बिघडून जाईल ही परिस्थितीच आज निर्माण होत आहे. मोठ्या शहरांमध्ये शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणारा जर मृत्यूुखी पडला तर घरातून दुर्गंधी येईपर्यंत शेजाऱ्याला कळत नाही. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर मदतीची याचना करणारा अनेक वाटसरुंना हात करतो पण प्रत्येकाला वेळ नसल्यामुळे कुणीही थांबायला तयार होत नाही. रस्त्यावर एखाद्याचे भांडण होत असेल तर सोडवायला कुणी जात नाही. इतका अलिप्तपणाने आज माणूस वागत आहे. यावेळी राजेश राऊत, रशिद पहेलवान, गणेश राऊत यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संतोष जमधडे, राजेंद्र जाधव, जे.के. चव्हाण, गणेश चव्हाण, रितेश पंचारिया, एकनाथ गायकवाड, राजकुमार बुलबुले, रवि तारो, मुवूंष्ठद खरात, संतोष रासवे, विठ्ठलराव दैने, रामेश्वर गाडेकर, सुनिल साबळे, गणेश तांबेकर, आयोजक सचिन दैने, अ?ॅड. दिनेश दैने, भगवान दैने, संतोष काळे, विष्णू तायडे, डॉ. मगर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक खरात यांनी तर सूत्रसंचालन गाडेकर यांनी केले.

टॅग्स :droughtदुष्काळArjun Khotkarअर्जुन खोतकर