मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ
अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयात सोमवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे, प्रा. दिगंबर भुतेकर, प्रा. पोपटराव सुरासे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. डॉ. रामनाथ सांगुळे, प्रा. डॉ. प्रशांत तौर, प्रा. विनोद जाधव, प्रा. दीपक राखुंडे, प्रा. रवींद्र पैठणे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
बदनापूर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तहसीलदार छाया पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नायब तहसीलदार संजय शिंदे, दिनेश राजपूत, रामेश्वर दळवी, अब्दुल समद फारूकी, आर. एन. धामणे, दळवी, पोलीस निरीक्षक मारूती खेडकर आदी उपस्थित होते.
प्राजक्ता झावरे, आशुतोष चौधरी यांची निवड
जालना : महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी प्राजक्ता झावरे व आशुतोष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तर नाशिक विभागप्रमुख म्हणून कुणाल पवार यांची निवड करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी अनेक आंदोलने संघटनेने केली आहेत. यासह अन्य मागण्यांसाठी लढा कायम राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बालिका दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर
जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ह्युमन चाईल्ड वेल्फेअर ॲण्ड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बालिका दिनानिमित्त सोमवारी कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी न्यायाधीश आर. बी. पारवेकर, अब्दुल रफीक अब्दुल रशीद, पी. जी. गावरे, के. ओ. रत्नपारखे आदी उपस्थित होते.