शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम अंबड : तालुक्यातील सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती उपसभापती रईस बागवान, ...

सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम

अंबड : तालुक्यातील सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती उपसभापती रईस बागवान, ग्रामविकास अधिकारी आत्माराम चव्हाण, कैलास कल्याणकर, डॉ. विलास भोजने, भगवान राखुंडे, जाकेर बागवान, अशोक राक्षे, नसीर बागवान, भगवान शिंदे, दत्तू फाटक, गजानन शिंदे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

खंडित वीजपुरवठा; शेतकऱ्यांची गैरसोय

अंबड : महावितरणकडून शेतीला होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपाचा होत आहे. रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना तासनतास विजेची वाट पाहत थांबावे लागत आहे. त्यात हिंस्र प्राण्यांची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ही बाब पाहता शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

शेलगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सपोउपनि पिंपळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मदन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एल.टी. मदन, मुख्याध्यापक अरविंद खरात, सुरज जाधव, अनिल कदम, जगन घुगे, परमेश्वर गवंगे, ऋषिकेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

सेवानिवृत्तीनिमित्त डिघे यांचा सत्कार

बदनापूर : सैन्यदलातील १७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले चितोड येथील किशोर दौलतराव डिघे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बंडू सुरडकर, सुभाष डिघे, प्रवीण श्यामल, शुभम शिंदे, शिवराज सिरसाट, पवन डिघे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दारूमुळे तळीरामांची संख्या वाढत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांनाही तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

अंबेकरांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

जालना : शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक संदीप कुलकर्णी, अशोक हांडे, एकनाथ हांडे, बबन पोहेकर, विठ्ठल पडूळ, राम गायकवाड, बाबुराव पवार, बाला परदेशी, सरपंच पद्माकर हांडे, रामा जाधव यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

शहरांतर्गत बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी

जाफराबाद : शहरांतर्गत भागातील अनेक पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय, चोरटेही अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या करीत आहेत. ही बाब पाहता बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरीवर्ग चिंतित

जालना : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा रब्बीतील पिके चांगली आहेत. परंतु, गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करून रोगराई कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, वाढलेल्या रोगराईमुळे यंदा रब्बीतील उत्पादनावरही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.