शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार अधिकाऱ्यांवरुन गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:00 IST

जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा कामकुचार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पुरात मरण पावलेल्यांना सभागृहाच्यावतीने श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर सदस्य जयमंगल जाधव यांनी जि.प. कार्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्वच शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. पाण्याची टाकी गेल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेली नाही. तेच पाणी आपण सर्वजण पित आहोत. साफ-सफाई करण्यासाठी जिल्हा परिषदेने ३० लक्ष रुपये खर्च करुन फॉगिंग मशीन खरेदी केल्या. परंतु, त्या मशीन तशाच पडलेल्या आहेत. त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रशासनाने जि. प. कार्यालयाची साफ-सफाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.कोणतेही काम घेऊन गेले तर कर्मचारी टेबलावर दिसत नाही. सकाळी अकरा वाजता कर्मचारी येऊन सही करतात आणि निघून जातात. त्यांच्याकडे आलेल्या फाईली पुढच्या टेबलावर सरकतच नाहीत. त्यामुळे कामे पेंडींग पडत आहे. याकडे सीईओंनी लक्ष देवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच सीईओंनी पथक तयार करुन कर्मचा-यांची पाहणी केली. यात अनेक कर्मचारी गैरहजार आढळून आले, जे गैरहजार होते. त्यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्याचे ते म्हणाले. या सभेला सर्व विभागाचे सभापती, अधिकारी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, तेथील सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न उभा आहेत. ही बाब पाहता जालना शहरासह जिल्हाभरातील संस्था, संघटना, शाळकरी मुलांसह सर्वसामान्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने ही पूरग्रस्तांना जवळपास १ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.जिल्ह्यात वनराई बंधारे तयार करणारजिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांतच जिल्हाभरात वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष खोतकर यांनी दिली. यासाठी सर्व ग्रामसेवकांना गावांची पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदcivic issueनागरी समस्याPoliticsराजकारणSocialसामाजिक