यावेळी एकही मराठा उमेदवार नियुक्तीच्या बाहेर राहणार नाही आणि मराठा समाजात असंतोष राहणार नाही या पध्दतीने तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले. पोलीस भरतीसाठी एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून, गृह विभागाने ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. पोलीस शिपाई भरती २०१९ करिता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. बैठकीस डॉ. संजय लाखे यांच्यासह राजेंद्र दाते, महेश राणे, युवराज सूर्यवंशी, विपूल माने, सिद्देश रणदिवे, सागर कदम, अभिजित तोरस्कर, सुरज मुळीक आदींची उपस्थिती होती.
पदभरतीबाबत ऊर्जामंत्री राऊत यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST