शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By विजय मुंडे  | Updated: April 27, 2024 19:31 IST

कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली

जालना : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहनांचे डिझेल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा महामार्ग सुरक्षा पथकाने शुक्रवारी रात्री पर्दाफाश केला आहे. चोरीच्या ४५० लिटर डिझेलसह एक कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर होते. त्यांना समृद्धी मार्गावरील नागपूरकडून मुंबईकडे जालना एक्झिट टोलनाक्याजवळ एका साईडला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (क्र. एमपी. ०४, सीएफ-३६४१) उभी होती. त्या कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता, कारमध्ये ३५ लिटरच्या डिझेलने भरलेल्या १३ कॅन, म्हणजे ४५५ लिटर डिझेल आढळून आले. वाहनांच्या टॅंकमधून डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप व साहित्य आढळून आले. यावेळी पोलिसांनी शिवनारायण भिल्ल (वय ३८), धर्मराज गणेश मांडोर (वय २०, दोघेही रा. शाजापूर जिल्हा, म.प्र.) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मुद्देमालासह आरोपींना चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाईही कारवाई महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक अनिता जामदार, पोलीस उपअधीक्षक डिसले, पोलीस निरीक्षक गिरी, प्रभारी अधिकारी कल्पना राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस हवालदार यशवंत मुंडे, संदीप बिऱ्हाडे, रोहन बोरसे, ज्ञानेश्वर खराडे माऊली, चालक विनोद भानुसे आदींनी केली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग