शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकरी आक्रमक; अंबड - पाथरी मार्गावर रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 18:33 IST

जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे.

- दिगंबर गुजरकुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ या दोन महसूल मंडळांतील ३३ गावांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही शासन मदत देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कुंभार पिंपळगाव येथे सकाळी अंबड - पाथरी मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात कुंभार पिंपळगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे. यात घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ मंडळांचा समावेश आहे. या भागातील गावांमध्येही खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना तयार झाली आहे. शासनाने भेदभाव न करता अनुदान द्यावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार खैरनार हे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, एक तास उलटूनही नायब तहसीलदार न आल्याने मंडळ अधिकारी एस. बोटुळे व पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनात रवींद्र तौर, गोविंद आर्दड, रखमाजी सुरासे, पिनू राऊत, कल्याण कंटुले, बन्सी शेळके, सिद्धेश्वर कंटुले, अतुल कंटुले, विलास काळे, गणेश आर्दड, विजय कंटुले, गजानन तौर, सुरेश काजळे, राजू धनवडे, नागनाथ जाधव, पंडित पवार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त, मग वगळले कसे?अतिवृष्टीचे अनुदान जाहीर करताना २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर करण्यात येते. परंतु, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ येथील पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असताना पावसाची नोंद कशी घेतली, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना