शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार डिंगऱ्या ‘एडीएस’च्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:27 IST

दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला विलास उर्फ डिंग-या हौशीराम सोनकांबळे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला विलास उर्फ डिंग-या हौशीराम सोनकांबळे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई गुरूवारी सकाळी शहरातील चंदनझिरा भागात करण्यात आली.जालना शहरातील सिध्दार्थनगर भागातील निळ्या किल्ल्याजवळ राहणारा विलास उर्फ डिंग-या हौशीराम सोनकांबळे याच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सदरबाजार पोलीस ठाण्याच्या वतीने सोनकांबळे याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिका-यांनी जानेवारी २०१९ मध्ये आदेश काढून सोनकांबळे याला तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. पोलिसांनी त्याला देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) येथे सोडले होते. मात्र, हद्दपार असतानाही सोनकांबळे हा जालना शहरातील चंदनझिरा भागात आल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पो.नि. यशवंत जाधव यांना मिळाली होती.या माहितीवरून पो.नि. जाधव व त्यांच्या सहका-यांनी गुरूवारी सकाळी कारवाई करून विलास सोनकांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण आदींनी केली.एडीएसच्या पथकाने चंदनझिरा येथील अनिल बोर्डे यांच्या घरासमोर कारवाई करून सोनकांबळे याला ताब्यात घेतले. पोहेकॉ. ज्ञानदेव नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम १४२ मपोका नुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नापोकॉ नरवडे हे करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस