शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळेची दयनीय अवस्था; तुटक्या पत्रावर बसून ग्रामपंचायत सदस्याचे अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:45 IST

अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळेची दयनीय अवस्था 

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील दाढेगांव  येथील जिल्ह परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधकाम करावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्त त्वरित जमा करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य  राजू दशरथ काकडे यांनी मंगळवारपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. दुरावस्था झालेल्या शाळेच्या पत्रावर बसून  काकडे यांनी बेमुदत उपोषण सूरू केल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आज उपोषणाचा दूसरा दिवस आहे.

अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिप शाळा १ ते ७  वी इयत्तापर्यंत असून ८ वर्ग खोल्यात १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनिय अवस्था झालेली आहे. सदर इमारत कधी पडेल हे  सागता येत नाही. इमारत दुरुस्तीसाठी जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी, पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे. परंतु अद्याप या जिर्ण झालेल्या शाळेच्या जागी नवीन इमारत किंवा याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी दुरुस्ती अथवा नवीन इमारतीची मागणी करत शाळेच्या पत्रावर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भरपावसात ही ते उपोषण करत आहेत. दरम्यान, उपोषण स्थळी गटशिक्षण अधिकारी यांनी भेट दिली आहे. मात्र, लेखी आश्वासन देण्याची उपोषणकर्ते काकडे यांनी मागणी केली आहे.

अहवाल जिल्हा परिषदेला पाठवलाजिल्हा परिषद शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणअधिकारी यांनी भेट देऊन मागण्या बाबत लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नाही, असे उपोषणकर्त्याने जाहीर केले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा परीषदकडे पाठवला आहे.- गोविंद चव्हाण,गटशिक्षणाधिकारी अंबड 

शाळेसाठी त्वरित निधी द्यावाजिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, कुठलीही दखल घेतलेली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याने शाळेच्या दयनीय अवस्थेची पाहणी करावी. तसेच शाळेसाठी ताबडतोब निधी देण्यात यावा.- राजू दशरथ काकडे, दाढेगाव ता. अंबड, ग्रामपंचायत सदस्य (उपोषणकर्ते)

टॅग्स :JalanaजालनाEducationशिक्षण