लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : शहरातील नाका कामगारांना बांधकाम प्रमाणपत्रावर सह्या द्याव्यात, या मागणीसाठी लालबावटा युनियनच्या वतीने गुरूवारी येथील नगर पंचायतीसमोर निदर्शने करण्यात आली.नगर पंचायतीने मंठा शहरातील नाका कामगारांची खात्री करून खऱ्या कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या द्या, ‘क’ वर्ग नगरपंचायत मध्ये मजुरांना त्वरित मनरेगाची कामे द्यावीत, मजुरांना सह्या न देणा-या व उर्मट भाषा वापरणा-या कर्मचा-याची चौकशी करून कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी राज्याध्यक्ष मारोती खंदारे, जिल्हा सचिव सरिता शर्मा, सचिन थोरात, कालिंदा प्रधान, बंडोपंत कणसे, शेषकला थटवले, सुवर्णा चाळक व मजूर उपस्थित होते.
‘लाल बावटा’ची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:49 IST