शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दानवे, खोतकरांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:59 IST

अर्जुन खोतकर हे शनिवारी आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात ते ‘गळ्यात गळा’ घालून एकमेकांशी सस्नेह गप्पा मारतानाही दिसले.

- संजय देशमुख जालना : वर्षभरापासून एकमेकांना पाण्यात पाहणारे व अलिकडच्या काळात कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बनलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे शनिवारी आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात ते ‘गळ्यात गळा’ घालून एकमेकांशी सस्नेह गप्पा मारतानाही दिसले.जालन्यात खा. दानवे यांच्या पुढाकाराने हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. आपल्या भाषणात दोघांनीही एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख केला. अलिकडे प्रत्येक कार्यक्रमात भाजपावर तुटून पडणारे खोतकर अत्यंत सौम्य भाषेत बोलताना दिसून आले. त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख जवळपास पाच ते सात वेळा केला. मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तीन वेळेस नाव घेतले. खा. दानवे यांना खासगीत ‘दादा’ या नावाने संबोधले जाते. तसाच उल्लेख खोतकरांनी केला. विशेष म्हणजे आपले राजकीय आरोग्य हे जनतेच्या हाती असते असेही खोतकर म्हणाले.>दानवे यांनी खोतकरांचा उल्लेख अर्जुनराव, असा केला. दानवे म्हणाले की, विकास कामांच्या बाबतीत आम्ही पक्षभेद विसरून एकत्र येतो. त्यामुळे मी आणि अर्जुनराव यांना एकाच व्यासपीठावर पाहून विशेषत: माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता होती, परंतु हे राजकीय बोलण्याचे ठिकाण नसून, आम्ही कुठे बोलतो आणि कुठे भेटतो, हे जाहीर करण्याची गरज नाही. आम्ही युतीचे शिलेदार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.>वादाचा इतिहास काय?जालना बाजार समितीच्या निवडणुकीत संचालक पदाच्या जास्त जागा भाजपाने मागितल्या होत्या. त्या देण्यावरून खोतकर आणि दानवे यांच्यात रस्सीखेच झाली होती. शेवटी तीन जागा शिवसेनेने भाजपाला देतानाच दानवे यांचे चुलतबंधू भास्कर दानवे यांना उपसभापतीपद दिले. हा वाद मिटतो न मिटतो तोच २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपाला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत युती करून जिल्हा परिषद युतीच्या ताब्यात ठेवावी असा आग्रह दानवे यांनी धरला होता. तो फेटाळून लावत अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून जिल्हा परिषदेत चुलत भाऊ अनिरूध्द खोतकर यांना अध्यक्षपदी विराजमान केले. उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे दिल्याने दानवे आणि खोतकरांमधील दरी वाढत गेली होती.>दोघांमध्ये अर्धा तास चर्चा : आरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा संपल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या घरी येतानाही खा. दानवे आणि राज्यमंत्री खोतकर हे एकाच गाडीतून आले. घरी आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना थांबवून त्यांनी किमान अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. ही चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे नंतर दोघांच्या देहबोलीवरून दिसून आले. ती चर्चा का झाली, हे मात्र कळू शकले नाही.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर