ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, संजय हेरकर व इतरांनी भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील सर्व विभागांच्या बदल्या प्रत्यक्ष समुपदेशन पद्धतीने कोरोनाकाळात राबवण्यात आल्या. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या या कोरोनाकाळासाठी अत्यंत प्रभावी पद्धतीच्या बदल्या होत्या. आज या पद्धतीच्या बदलीची गरज असताना ग्रामविकास विभागाने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. आंतरजिल्हा बदलीचे चार टप्पे आजपर्यंत ग्रामविकास विभागाने यशस्वीपणे ऑनलाइन बदली प्रक्रियेने हाताळले आहेत. हा ऑनलाइन बदली प्रयोग राबवणे गरजेचे होते. मात्र ही प्रक्रिया राबविली जात नसल्याचे सांगण्यात आले. तसेच बदलीपात्र शिक्षक हे ऑनलाइन पद्धतीने बदली अर्ज भरतात. त्यामुळे कुठेही गर्दी होत नाही. कोरोना नियमाचा कुठेही भंग होत नाही. त्यामुळे ३ ऑगस्ट २१ चे पत्र रद्द करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याची वाट न पाहता बदली पोर्टल सुरू करावे, ऑनलाइन पद्धतीने बदली अर्ज मागून घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
फोटो