भोकरदन - शहरातील सराफा मार्केट ते पोस्ट ऑफिसपर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर वाहनचालक वेगाने वाहने चालवित आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वीच सराफा मार्केट ते पोस्ट ऑफिसपर्यंत नवीन सिमेंट रोडचे काम करण्यात आले; परंतु रस्त्यावर जागोजागी भेगा पडत असल्याने लवकरच रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली, तसेच सराफा मार्केट येथे सोने-चांदीची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असे असतानाही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित आहेत, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर मोहम्मद हुसेन, अमोदी चाऊस, फैसल चाऊस, अली चाऊस साऊद, चाऊस शेख ऊजैफ आदी उपस्थित होते.