भोकरदन : शहरातील सराफा मार्केट ते पोस्ट आॅफीसपर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सराफा मार्केट ते पोस्ट आॅफीसपर्यंतच्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच काम करण्यात आले. परंतु, रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सराफा मार्केटमध्ये सोने-चांदीची दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशातच काही दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी शहराध्यक्ष मोहम्मद हुसेन अमोदी चाऊस, फैसल चाऊस, अली चाऊस साऊद चाऊस, शेख ऊजैफ यांनी केली.