शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:06 IST

'५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा' ही प्रमुख मागणी; मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी बांधवांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी जोर धरत आहे. 

- पवन पवार

वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजही एकवटला आहे. मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथेच ओबीसी बांधवांनी आज, सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या दुहेरी आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.

ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवून आरक्षणात होत असलेली 'घुसखोरी' थांबवावी, या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:- ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा: मराठा समाजाला 'कुणबी' प्रमाणपत्रे देण्याच्या निर्णयाला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. या प्रमाणपत्रांमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा त्यांचा आरोप आहे.- शिंदे समिती रद्द करा: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ रद्द करावी, अशीही त्यांची मागणी आहे.- शैक्षणिक आणि आर्थिक समस्या: ओबीसी आणि भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर कराव्यात. तसेच, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्यावा, जेणेकरून या समाजाच्या विकासाला चालना मिळेल.

अंतरवाली सराटी पुन्हा केंद्रस्थानीमनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी याच अंतरवाली सराटी गावातून आंदोलन सुरू केले होते आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच ठिकाणी ओबीसी समाजाचे उपोषण सुरू झाल्याने हे ठिकाण पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे केंद्र बनले आहे. यामुळे दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, उपोषणस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकार, राजकीय पक्ष कोंडीतएकीकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांना विरोध करत आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज आक्रमक होत आहे, तर स्वतंत्र आरक्षणासाठी सरकारला कायद्याच्या आणि न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागेल. या दोन्ही समाजांमधील संघर्षामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. यावर सरकार आणि राजकीय पक्ष कशाप्रकारे तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना