भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषी व्यापारावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सुधारला पाहिजे, शेतीची उन्नती झाली पाहिजे, या विचाराने कुठल्याही पक्षाचे सरकार येवो; परंतु शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना आणून देश सुखी व समृद्ध करण्याचा विचार सरकारच्या ध्येय- धोरणांमध्ये असतो; परंतु केंद्र व राज्य सरकारने घोषित केलेल्या योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? पोहोचल्या तरी त्या योजनांचा प्रवास शेतकऱ्यांसाठी किती खडतर असतो, हे सांगणे गरजेचे नाही.
अंबड तालुक्यात मागील पाच वर्षांपासून ठिबक सिंचनामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. काही प्रकरणात तर सात-बारा एकाच्या नावाचा व जिओ टॅगिंग दुसऱ्याच्याच शेतात. यांसह अनेक प्रकार अंबड तालुक्यात घडले असल्याचेही रामेश्वर खरात यांनी म्हटले आहे.