शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:52 IST

एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांखाली ३५ हजारांचा दंडही ठोठावला. ही घटना जानेवारी २०१६ मध्ये भोकरदन शहरात घडली होती.कमलाकर लक्ष्मण ढसाळ (४० रा. भोकरदन) असे आरोपीचे नाव आहे. २० जानेवारी २०१६ रोजी कमलाकर ढसाळ याने शहरातील एका ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला होता. ढसाळ विरूध्द भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी डीवायएसपी ईश्वर वसावे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. प्रधान यांच्या समोर झाली. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील जयश्री सोळंके यांनी काम पाहिले. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश प्रधान यांनी आरोपी कमलाकर ढसाळ याला कलम ३७६ भादंवि व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजारांचा दंड, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याप्रमाणे १० वर्षे शिक्षा व १० हजार रूपये दंड व दोन वर्षे शिक्षा व २ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे सहायक सरकारी वकील जयश्री सोळंके यांनी सांगितले.या प्रकरणात फिर्यादी, पीडित मुलगी, तपासिक अंमलदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. साक्ष व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारjailतुरुंग