शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

केदारखेडा येथे तीव्र पाणी टंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:24 IST

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती : नदी उशाला अन... कोरड घशाला, टँकरचे प्रस्ताव पडून

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. टँकरचे प्रस्ताव प्रशासनाला पाठवूनही त्यावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने ग्रामस्थांत संताप आहे. नदी उशाला अन... कोरड घशाला असा प्रकार झाला आहे.परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरातील पुर्णा नदी ओसंडून वाहली नाही. नदी परिसरत असलेल्या शासकीय विहीरीरवुन गावाला पाणी पुरवठा होतो, मात्र हिवाळ्यातच विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे गावातील नळाला चार महिन्यापासून पाणी आले नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.यामुळे पाण्याविना ग्रामस्थांचे हाल सुरुआहे. ग्रामपंचायत टँकरने पाणीपुरवठा करावा असा प्रस्ताव प्रशासना पाठविला आहे. मात्र त्याचा पाठपुरावा नसल्याने अद्यापही टँकरचा प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून केदारखेड्याची ओळख आहे. असे असतांना गावात चार महिन्यापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्याविना ग्रामस्थांचे हाल सुरु आहे. विशेष करुन महिलांना पाणी शेंदून आणण्याच वेळ आली आहे. ग्रा.प. प्रशासन टँकरचा प्रस्ताव पाठवून नामानिराळे झालेले आहे, गावाला चार महिण्यांपासून पाणी नसल्याचे त्यांना सोयर सुतक नाही, दिलेला प्रस्तावास मंजुरी का मिळाली नाही. यांची दखल ग्रा.प. कडून घेण्यात आलेली नाही. गुलदस्यात्यात आहे. केदारखेडा गाव तिन ठीकाणी विस्तारीत झालेले आहे. गावाची लोकसंख्या तीन हजारापेंक्षा जास्त आहे.गावाला पुर्णा नदी पात्रात असलेल्या विहिरीवरुन पाणी पुरवठा होतो. ग्रा.पं. दुर्लक्षामुळे विहिरीमध्ये मोठा गाळ साचला आहे. परिणामी विहिरीने आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे. आहे. विहिरीच्या कामाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. या गावाला बानेगाव मध्यम प्रकल्पातून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची नितांत गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याचे तीन महिने अजून जायचे आहे. या उन्हाळ्यात पाण्याविना हाल होण्याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater scarcityपाणी टंचाई