शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:00 IST

तळणी ( जालना ) : वृद्ध पती-पत्नीचा घारतच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ ...

तळणी (जालना) : वृद्ध पती-पत्नीचा घारतच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान तळणी परिसरातील शिरपूर (ता. मंठा) गावातील आदीवासी वस्तीवरील मुंगसाजी परिसरात घडली. एका घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे घटना उघडकीस आली. धोंडिबा कानुजी कोकाटे (वय ८०), तर वच्छलाबाई धोंडिबा कोकाटे (वय ७४) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

मंठा तालुक्यातील शिरपूर गावातील आदीवासी वस्तीवरील मुंगसाजी परिसरात धोंडिबा व त्यांची पत्नी वच्छलाबाई हे दोघेही एकत्र राहत होते. त्यांना चार मुले आहेत. त्यातील एक गावात, तर तिघे बाहेरगावी वास्तव्यास आहेत. या मृत पती-पत्नीने आठ-दहा दिवसांपूर्वी स्वत:जवळ असलेल्या बकऱ्यांची विक्री केली होती. त्यातून त्यांना दीड ते दोन लाख रूपये मिळाले होते. या पैशातून त्यांचा खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धोंडिबा कोकाटे व वच्छलाबाई कोकाटे यांचा मृतदेह मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हे कुटूंब गेल्या १५ वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहे. या पती-पत्नीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. याचा तपास मंठा पोलिस करीत आहेत, अशी माहिती तळणी पोलिस चौकीचे बीट जमादार रखमाजी मुंडे यांनी दिली आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी