शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:43 IST

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे.

ठळक मुद्दे या अपघातात ११२ जण गंभीर जखमीखड्डे ठरतायत धोकादायक

जालना : कोरोनामुळे खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक जण खाजगी वाहनांचा वापर करीत प्रवास करीत असून, रस्ता अपघातात वाढ होत आहे. चालू वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावर १२१ अपघात झाले आहेत. त्यात ७२ जणांचा बळी गेला असून, ११२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर बंदी आणण्यात आली होती. कोरोनापूर्वी जानेवारीत जिल्ह्यातील महामार्गावर १७ अपघात झाले आहेत. १२ जणांचा बळी गेला असून, १९ जण गंभीर जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यातही १७ अपघात झाले. या अपघातांमध्ये १२ जणांचा बळी गेला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले; परंतु राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील अपघाताचे सत्र कायम राहिले.

मार्च महिन्यात १३ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर २३ जण गंभीर जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या तीन अपघातांत तिघांचा बळी गेला आहे. मे महिन्यात १० अपघात झाले आहेत. या अपघातांत पाच जणांचा बळी गेला आहे, तर १३ जण गंभीर जखमी झाले. जून महिन्यात ११ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुलै महिन्यात १४ अपघात झाले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे, तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ११ अपघात झाले असून, त्यात सात जणांचा बळी गेला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले.

सप्टेंबर महिन्यातही ११ अपघात झाले. यात पाच जणांचा बळी गेला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ऑक्टोबर महिन्यात १४ अपघात झाले आहेत. यात सात जणांचा बळी गेला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी महामार्गाची दुरवस्था आणि चालकांकडून वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. 

खड्डे ठरतायत धोकादायकजिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत, तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी साईड पंखे नसल्यानेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्याची गरज आहे.

नियमांचे पालन महत्त्वाचेरस्ता अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेळोवेळी वाहनचालकांच्या बैठका घेऊन, कार्यक्रमांमध्येही समुपदेशन केले जाते. कारवाया करतानाही चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. -पोउपनि. हरेश्वर घुगे, महामार्ग पोलीस, जालना

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना