शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबादमध्ये वीजेचा शॉक लागून आजी-नातीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 19:05 IST

चारचाकीत उतरला विद्युत प्रवाह

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील देवगाव उगले येथील मंगलादेवीच्या यात्रेत  देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अनुसयाबाई शंकर साबळे (६०) व अश्विनी नंदू साबळे (१८) या आजी आणि नातीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमार घडली आहे. त्यांच्या सोबत असलेल्या शारदा भाऊसाहेब कांबळे ( ३२ ) (रा. पिंपळखुटा) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार जाफराबाद येथे करण्यात येऊन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.

देऊळगाव ऊगले  येथे दरवर्षी जय महाकाली मंगला देवीची यात्रा उत्सवा निमित्य  परीसरातील हजारो भावीक भक्तगण दर्शनासाठी येत असतात, यात्रे निमित्त भक्तांच्या मनोरंजनासाठी रात्री समाज प्रबोधन व कथेचे आयोजन या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे करण्यात आले होते. देवीचे दर्शन आणि कथा, कार्यक्रम पाहण्यासाठी आजी नातवासह स्वत:च्या बँडपार्टीच्या गाडीत बसून आल्या होत्या. मध्येच ही दुदैर्वी घटना घडली आहे.

कथेच्या निमीत्ताने गर्दी असल्याने रिकाम्या जागेत बँण्ड पार्टीची चारचाकी बाजूला लावत असताना मुख्य तारांचा विधुत प्रवाहाची लाईनला गाडीचा वरच्या बाजुने स्पर्श होवुन गाडीत विद्युतप्रवाह उतरला. यानंतर गाडीत बसलेल्या आजी अनुसयाबाई साबळे, व अश्विनी साबळे या दोघींना विजेचा जबर शॉक लागला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर शारदा कांबळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालनाelectricityवीज