पवन पवार / वडीगोद्री : वडीगोद्री येथील धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेच्या मागील बाजूचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी बँकेत चोरीचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. मात्र, बँकेतील ऐवज सुरक्षित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला रुमाल बांधून तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे.
रविवारी सकाळी उघडकीस आली घटना
चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता उघडकीस आली. बँकेत चोरी झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली.
पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद
बँकेकडे येताना व जाताना पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, यामध्ये दोन बुरखाधारी चोरटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या मागील बाजूला असलेल्या ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल परिसरातील कॅमेऱ्यातही हे चोरटे कैद झाले असून, शाळेजवळील शेतात मोठा गॅस सिलेंडर, एक फोटो गॅस टाकी आणि एक बॅग आढळून आली आहे.
पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण हावले आणि पोलीस पाटील अश्विनी गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे वडीगोद्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.
Web Summary : Thieves broke into Wadigodri's SBI branch, disabling CCTV cameras. The incident, discovered Sunday, revealed five suspects on camera, including two masked individuals. They breached the shutter, ransacked cabinets, and fled. Police are investigating the daring heist, causing fear in the area.
Web Summary : वडिगोध्री के एसबीआई शाखा में चोरों ने सेंध लगाई, सीसीटीवी कैमरे निष्क्रिय किए। रविवार को पता चलने पर घटना का खुलासा हुआ, कैमरे में दो नकाबपोश सहित पांच संदिग्ध दिखे। शटर तोड़कर, अलमारियाँ खंगालीं और भाग गए। पुलिस जाँच कर रही है, इलाके में दहशत है।