शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून साडेचार लाख रुपये गोळा करून दुरुस्त केला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:47 IST

पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे.

फकिरा देशमुुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीला परतीच्या पावसामुळे आलेल्या महापुरात १२ बंधारे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता लोकसभागातून ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे. या पाण्याचा परिसरातील २०० हेक्टर सिंचनाला फायदा होणार आहे़आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आला होता. या पुरामुळे पूर्णा, जुई, गिरजा, रायघोळ, धामणा या नद्यांवरील १२ ते १५ कोल्हापुरी बंधारे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. बंधारे फुटल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने पंचनामे करून दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला.मात्र, त्याला मंजुरी कधी मिळेल व काम कधी होणार याची वाट न बघता जैनपूर - कठोरा येथील सोनाजी दांडगे, हरिदास कोठाळे, बंडू पाटील, रामकिसन कोठाळे, बाबूराव सोनोने, बिसन जाधव, आप्पा कोठाळे, रामदास रोडे, विठ्ठल रोडे, सुधाकर रोडे, रत्नाकर रोडे यांनी या बंधा-याचा लाभ मिळणा-या सर्व शेतकऱ्यांची बैठक घेतली.बैठकीत प्रत्येक शेतक-याने ३ हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला. सर्व शेतकºयांनी दिलेल्या वर्गणीतून ४ लाख रुपये जमा झाले. पोकलँन, जेसीबी व तीन टिप्परच्या माध्यामातून फुटलेल्या बंधा-याच्या वाहून गेलेल्या भागात माती व मुरूमाचा भराव टाकला. त्याला आतल्या बाजूने प्लॅस्टिकची पन्नी लावण्यात आली.पाणी व माती वाहून जाणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली. यामुळे ७९३ सघमी. पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी