शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:34 IST

द्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लालपरीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे आजही लालपरीने प्रवास करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. सद्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळाला दररोज सरासरी २२. ५० लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.‘एसटी प्रवास- सुखाचा प्रवास’ असे ब्रीदवाक्य घेऊन लालपरी दिवस- रात्र प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्याने धावत आहे. जालना विभागात एकूण २५० बस आहेत. या बसचे महामंडाळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नेहमी योग्यरित्या नियोजन केले जाते. यात काळानुरूप बसमध्ये बदल करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये उशिराने जाईन, पण लाल डब्यानेच जाईल, असे बोलले जाते.एसटी. महामंडळ नेहमी तोट्यात चालले असल्याचा गवगवा सर्वत्र केला जात आहे. यावर मात्र, जालना विभागाने पर्याय शोधला आहे.अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी उपाय- योजना केल्या जातात. ज्या मार्गावर अधिक वाहतूक आहे. त्या मार्गावर अधिक बसेस सोडल्या जातात. आजरोजी जिल्ह्यातील २५० बसमधून नियमित सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळाला सरासरी २२.५० लाख रूपयांचे उत्पन्न दररोज प्राप्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्वाधिक प्रवासी जालना आगारातजिल्ह्यातील सर्वच आगारांपैकी सर्वाधिक प्रवासी जालना आगारातून प्रवास करीत आहेत. या आगारातील बसमधून जवळपास १९ हजार प्रवासी नियमित प्रवास करीत आहेत. या पाठोपाठ अंबड आगारातील बसमधून प्रवास करण्याला प्रवासी पसंती देत असल्याचे दिसून येते. या आगारातील बसमधून १८ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जाफराबाद आगारातील बसमधून १७ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. तर सर्वात कमी परतूर आगारातील बसमधून ९ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.१९ हजार १०६ विद्यार्थ्यांचे ‘अपडाऊन’आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे जवळपास १९ हजार १०६ विद्यार्थी शिक्षणासाठी बसने ‘अपडाऊन’ करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी बसचे पासेस काढलेले आहेत. यातून महामंडळाला महिन्याकाठी जवळपास एक कोटीहून अधिक उत्पन्न प्राप्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक