शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यातील गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आगामी गणेशोत्सव, निवडणुकांसह इतर सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध कारवाया केल्या जात ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी गणेशोत्सव, निवडणुकांसह इतर सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध कारवाया केल्या जात आहेत. गावगुंडांना लगाम लावण्यासाठी त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस दलाकडून चालू वर्षात दाखल झालेल्या प्रस्तावानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आजवर १३ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर ३७ प्रस्ताव प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध कारवाया सतत राबविल्या जातात. प्रतिबंधक कारवाई करण्यावर भर दिला जातो. मात्र, अशा कारवाईनंतरही गुंडगिरी करणाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी हद्दपार करण्याचा धडाका लावला आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हद्दपारीच्या कारवाईच्या दुप्पट कारवाई चालू वर्षातील सात महिन्यात करण्यात आल्या आहेत.कलम ५५ मपोका अंतर्गत टोळीतील तिघांचा तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या तिघांनाही हद्दपार करण्यात आले आहे.दोन वर्षात ५५ : तर सात महिन्यांत ५२ प्रस्तावपोलीस दलाकडून मागील तीन वर्षात एकूण १०७ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठविण्यात आले होते. यात मागील दोन वर्षात २०१७ व २०१८ मध्ये तडीपारीचे ५५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. तर चालू वर्षात २०१९ मध्ये सात महिन्यातच तब्बल ५२ प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत.आगामी काळात गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका, दिवाळीसह इतर सण-उत्सव साजरे केले जात आहेत. निवडणुकांसह सण-उत्सव शांततेत पार पडावेत, गुंडगिरीला आळा बसावा, यासाठी ठाणेस्तरावरून हद्दपारीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामुळे गुंडगिरी करून समाजात दहशत पसरविणा-यांना चांगलाच चाप बसणार आहे...तर कारवाईहद्दपारीच्या कालावधीत संबंधित व्यक्ती शहरासह जिल्ह्यात दिसला तर त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते. स्थानिक गुन्हे शाखा, एडीएससह ठाणेस्तरावरून या कारवाई केल्या जातात. तडीपार आरोपी दिसला तर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसCrime Newsगुन्हेगारी