शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेशांतर करून फिरणाऱ्या गुंडाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:00 IST

१४ एप्रिलच्या मिरवणुकीत वेशांतर करुन फिरणारा तडीपार आरोपी डिंग-या उर्फ विलास हौशीराम सोनकांबळे याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री सुभाष चौक ते महावीर चौक दरम्यान अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : १४ एप्रिलच्या मिरवणुकीत वेशांतर करुन फिरणारा तडीपार आरोपी डिंग-या उर्फ विलास हौशीराम सोनकांबळे याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री सुभाष चौक ते महावीर चौक दरम्यान अटक केली.एकाच महिन्यात तीनदा तडीपारीचे उल्लंघन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडावर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते यामुळे पोलिसांनी कारवाई करुन तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती आहे. डिंगºया उर्फ विलास हौसीराम सोनकांबळे याच्याविरुध्द शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असल्याने एडीएसच्या पथकाने २४ मार्च रोजी डिंगºयाला नूतन वसाहत परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली होती. त्यानंतरही तो शहरात आढळून आल्याने ८ एप्रिलला गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. दोन वेळेस पकडूनही रविवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत वेशांतर करुन सुभाष चौक ते महावीर चौक परिसरात फिरताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या पथकाला आढळून आला. पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला झडप मारुन ताब्यात घेतले.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक सिंघल यांनी जिल्ह्यातील निवडणूक काळात गुन्हेगारांची धरपकड करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. यामुळे जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क होऊन स्थानिक गुन्हे शाखा, एडीएससचे पथक आणि चारही उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. गुंड डिंगºया उर्फ विलास सोनकांबळेला जालना, औरंगाबाद , बीड या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. असे असताना तो शहरात आढळून येतोच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस त्याला शहरापासून २५ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा परिसरात सोडून आपले हात वर करत आहेत. निव्वळ केसेस दाखल करण्याच्या नादात पोलीस यंत्रणा ठोस कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांत संताप आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJalna Policeजालना पोलीस