ट्रकची बॅटरी चोरीस; गुन्हा दाखल
जालना : शहरातील गोपीकिशननगर येथे उभा केलेल्या ट्रकच्या बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ मे रोजी घडली. याप्रकरणी नीरज बिडकर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
लॅपटॉप, मोबाइल चोरीस; गुन्हा दाखल
जालना : घरातील खिडकीजवळील टेबलावर ठेवलेला मोबाइल व लॅपटॉप कोणीतरी चोरून नेल्याची घटना जुना जालना भागातील प्रयागनगर येथे बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी आकाश प्रभाकर चेके यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक साळवे करीत आहेत.
घरातून मोबाइल चोरी; गुन्हा दाखल
जालना : घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात ठेवलेला मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जुना जालना भागातील शिवनगर येथे घडली. याप्रकरणी चंद्रकांत रामराव बुचाले यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सफौ. सय्यद करीत आहेत.
नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
जालना : तालुक्यातील सेवली येथे डीजे लावून लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागाेराव परसराम राठोड (रा. वसंतनगर ता. सिंदखेड राजा) याच्याविरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.