शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:17 IST

जमीन कायदेशीर परवानगी न घेता आणि शासनाला भरावा लागणारा नजराना न भरता परस्पर प्लॉटिंग करून विक्रीस काढल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात यापूर्वीच अनेक भूखंड घोटाळे मोठ्या प्रमाणावर गाजले आहेत. शहरातील गोल्डन ज्युबिली शाळा परिसरातील सर्वे क्रमांक १७३ मध्ये चार एकर इनामी जमीन होती. ही जमीन कायदेशीर परवानगी न घेता आणि शासनाला भरावा लागणारा नजराना न भरता परस्पर प्लॉटिंग करून विक्रीस काढल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक अरूण अग्रवाल यांनी याबाबत तक्रार दिली असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आणि नागरिकांची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे.शहरात यापूर्वी वेगवेगळ्या भागांमधील भूखंड घोटाळा प्रकरणांमध्ये यंत्रणांचा चुकीचा वापर करून बनावट पीआरकार्ड आणि अन्य कागदपत्रे तयार करून भूखंड विक्री करण्यात आले आहेत.याही प्रकरणांमध्ये असाच प्रकार यंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची दिशाभूल करून जमीन विक्रीचे प्रकरण पुढे आले आहे.या प्रकरणी अरूण अग्रवाल यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यात लेआऊट मंजूर नसताना पीआरकार्ड तयार करणे तसेच इनामी जमीन असताना ती विक्री करण्यासाठी शासनाकडून हवी असलेली परवानगी न घेणे, नजराणा न भरणे इ. मु्द्यांचा उहापोह अरूण अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे. पोलिसांच्या पुढील तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना विचारले असला आजच तक्रार दाखल झाली आहे. त्यात आम्ही आणखी दोन्ही बाजूंची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.अग्रवाल यांच्या तक्रारीवरून रंगनाथ अप्पा काटकर, प्रकाश रंगनाथ काटकर, लक्ष्मण तुकारामअप्पा काटकर, नारायण लक्ष्मण काटकर, कैलास लक्ष्मणअप्पा काटकर, शिवा लक्ष्मणअप्पा काटकर, निरंजन रंगनाथअप्पा काटकर, केसरबाई रंगनाथअप्पा काटकर, अमोल प्रकाशअप्पा काटकर, भास्कर तात्याराव खुळे, सुमनबाई पाराजी अप्पा औरंगे, सुमनबाई लक्ष्मण अप्पा औरंगे, गंगा अशोक नामदे, सुनीता रंगनाथ परळकर, हर्ष सुनील बोरा, श्रीया दीपक गेलडा, सचिन भानुदास मिसाळ, रश्मी विनोद भरतीया, संतोष पन्नालाल करवा यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभाग